School Image

डी.बी. घुमरे पब्लिक स्कूल तिरुपती कॉलनी, बीड बद्दल

छत्रपती संभाजी राजे शिक्षण प्रसारक मंडळ व कै. वंचाळाबाई घुमरे शिक्षण प्रसारक मंडळ, पारगाव घुमरा. ता. पाटोदा जि. बीड संचलित जिल्ह्यामध्ये वेगवेगळे शैक्षणिक संकुल 1995 पासून अतिशय दर्जेदार असे गुणात्मक शिक्षण देण्याचे काम करत आहेत. या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्व. द.बा. घुमरे तात्या यांच्या दूरदृष्टीने व संस्था सचिव श्री दिपक दादा घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ,गेवराई, अंबाजोगाई या ठिकाणीआमच्या सर्व शाखा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सदैव कटिबद्ध आहेत. एकविसाव्या शतकात शिक्षणात अमुकलाग्र बदल होत आहेत. ज्ञानार्जन ,ज्ञानसंवर्धन व ज्ञान समृद्धी हा सर्वांचा हक्क आहे आणि या हक्काबरोबर आपलीही काही जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून शिक्षणामध्ये होणारे बदल स्वीकारून नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यास आपल्या विद्यार्थ्यांना प्रबळ व सक्षम बनवले पाहिजे. या स्पर्धेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन सर्वंकष मूल्यमापन व्हावे व नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून विविध उपक्रम या शैक्षणिक संकुलामध्ये घेतले जातात. यामध्ये क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, बालसभा, सुसज्ज संगणक कक्षात संगणकाची माहिती व हाताळणी , वकृत्व स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन,शैक्षणिक सहलीचे आयोजन, वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते‌. तसेच प्रज्ञावान विद्यार्थी घडवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये आठवी शिष्यवृत्ती ,पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय, एन एम एम एस, एम टी एस, ओलंपियाड, गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षा ,पाचवी व आठवी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर आधारित महा एक्झाम परीक्षा इत्यादी परीक्षांना विद्यार्थी बसवून त्यांच्या जादा तासिका घेऊन , दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा जादा तास घेऊन विशेष तयारी करून घेतली जाते . इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना नीट, जे ई ई सारख्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय शिक्षणापासूनच व्हावी म्हणून आमच्या शैक्षणिक संकुलात फिजिक्स, केमिस्ट्री, बायलॉजी आणि मॅथ या विषयाचे फाउंडेशन वर्ग घेतले जातात.

अशा प्रकारे वैविध्यपूर्ण, सृजनशील उपक्रमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी आमचे शिक्षक सातत्याने मेहनत घेत आहेत. आमच्या प्रत्येक शाखेची सुसज्ज अशी इमारत असून भव्य क्रीडांगण, भौतिक सुविधा, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष अशा सुविधा आहेत. या दोन्ही संस्था अंतर्गत खालील प्रमाणे शाखा कार्यरत आहेत.

Our Commite Member

ecommerce

मंजुश्रीताई निंबाळकर

पद:- अध्यक्ष

ecommerce

डॉ. उदयराज दिपकराव घुमरे

पद:- उपाध्यक्ष

ecommerce

श्री अभिराज दिपकराव घुमरे

पद:- कोषाध्यक्ष

ecommerce

श्री दिपकराव दत्तात्रयराव घुमरे

पद:- सचिव

ecommerce

श्री प्रदीपभाऊ दत्तात्रराव घुमरे

पद:- सहसचिव

ecommerce

श्री संजय ज्ञानोबा निंबाळकर

पद:- सभासद

ecommerce

सुनिता गोरखनाथ कावळे

पद:- सभासद